![]() |
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात महसूल विभागाने पकडले गुरुवारी पहाटे 3 वाजता केली कारवाई |
संदीप जोगी मुक्ताईनगर....
मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू व गौण खनिजाची वाहतूक होत असून गेल्या दोन दिवसापासून महसूल विभागाने अवैधरित्या वाळू व गौण खनिज करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचललेला आहे. यामुळे अवैध वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर चालक मालक यांचे धाबे दणाणले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील कुऱ्हा धोपेश्वर रस्त्यावर परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार गिरीश वखारे यांना मिळाली होती.
तालुक्यातील कुऱ्हा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार गिरीश वखारे यांच्यासह नायब तहसीलदार निकेतन वाडे , मंडळ अधिकारी धनराज मुंडे ,तलाठी निलेश काळे ,तलाठी नितीन उपराटे ,तलाठी किशोर खरात ,तलाठी अमित इंगळे ,तलाठी विशाल जाधव, तलाठी सोमनाथ बोराटकर, सांगा यो ऑपरेटर उमेश झाल्टे यांनी स्वतः 16 ऑक्टोंबर सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा धूपेश्वर रस्त्यावर जात असलेल्या दोन भरलेले वाळूचे डंपर पकडले. प्रसंगी कुऱ्हा आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. ताब्यात घेतलेली वाहने कुऱ्हा आऊट पोस्ट पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली आहे. विना नंबर चे एक डंपर राहुल वाघ राहणार वाघजाळ तालुका मोताळा यांच्या मालकीचे असून दुसरे डंपर नंबर एम एच 37 जे 14 69 हे शेख वसीम राहणार पारपेठ तालुका मलकापूर यांचे मालकीचे आहे. दोघं डंपर मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात येत असल्याचे निवासी नायब तहसीलदार निकेतन वाडे यांनी सांगितले .
बुधवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी शिवारामध्ये दोन डंपर व एक जेसीबी अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना पकडले होते. सतत झालेल्या दोन कारवाईमुळे अवैधरित्या वाळू व गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रॅक्टर चालकां चे धाबे दणाणले आहे.