मुक्ताईनगर (अतिक खान) जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज मुक्ताईनगर येथे काँग्रेस पक्षाची विधानसभा स्तरावरील महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती, उमेदवारांच्या मुलाखती तसेच निवडणूक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे अध्यक्षस्थान मा. आरिज बेग मिर्झा, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी भूषविले, तर मुक्ताईनगर विधानसभा निरीक्षक मा. तुळशीराम नाईक व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस धनंजय भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारीबाबत माहिती घेतली.
या प्रसंगी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृषिरत्न दिनेश पाटील, बोदवड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भारत भाऊ पाटील, व्हीजीएनटी सेल प्रवक्ते अॅड. अरविंद गोसावी, जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भोईसर, शरद महाजन, पुंडलिक धायले, बि.डी. गवई साहेब, बोदवड शहराध्यक्ष नानाभाऊ नेरकर, डॉ. विष्णू रोटे, बाळूभाऊ पाटील येवती, प्रा. सुभाष पाटील, सलीम मंत्री, गुलाबराव महाराज, राजेंद्र जाधव विधानसभा युवक काँग्रेस, ज्ञानेश्वर इंगळे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, अमोल पाटील, बाळूभाऊ कांडेलकर, सुनील सुरवाडे, अनंतराव देशमुख, संजय चौधरी, गणेश पाखरे, आरिफ रब्बानी, भास्कर वानखेडे, सुभाष सूर्यवंशी, आलम शाह, मधुकर कोसोदे, संजय धामोडे, पुंजाजी पाटील, विजय देवराम पाटील, यासीन खान, तसेच सेवादल महिला तालुका प्रमुख सौ. सुमनबाई चौधरी, महिला शहराध्यक्ष सौ. ज्योतीताई धामोळे, अर्जुन मराठे यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

