वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका कार्यकारिणीची महत्वाची बैठक ३० ऑक्टोबरला
मुक्ताईनगर (अतिक खान) :
वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका कार्यकारिणीची महत्वाची बैठक दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी, गुरुवार दि. सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक तालुका अध्यक्ष आयु. दिलीप डी. पोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
या बैठकीत नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच गण/गट या सर्व स्तरांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची चाचपणी करून निवडणूक तयारीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मा. शमीभाताई पाटील, जिल्हा महासचिव ऍड. योगेश तायडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनावणे या विशेष मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत पुढील विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे :
गण/गटातील पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांची चाचपणी.
मुक्ताईनगर शहर कार्यकारिणी गठित करण्याबाबत विचारविनिमय.
निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या जागी कार्यक्षम पदाधिकाऱ्यांना संधी देत तालुका कार्यकारिणीतील फेरबदल.
अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने आयत्यावेळी उद्भवणाऱ्या विषयांवर चर्चा.
सदर बैठक ही मुक्ताईनगर पंचक्रोशीतील सर्व SC, ST, OBC, VJ/NT समाजघटकातील कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व मान्यवरांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्वांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीचे ठिकाण: प्रशिक नगर, आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या घराजवळ, मुक्ताईनगर.
वेळ: सकाळी ११.३० वाजता
दिलीप डी. पोहेकर – तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मुक्ताईनगर
सौ. संगीताबाई धोबी – तालुका अध्यक्षा, वंचित बहुजन महिला आघाडी, मुक्ताईनगर