![]() |
मलकापूर : उम्मत अकॅडमी तर्फे ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन |
मलकापूर (प्रतिनिधी) – ईद मिलादुन्नबीच्या औचित्याने उम्मत अकॅडमीच्या वतीने इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ८८ विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.
स्पर्धेत झेड. ए. उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मलकापूर येथील निदान खान इरफान खान याने प्रथम क्रमांक पटकावून ३,००० रुपयांचे पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक व २,००० रुपयांचे पारितोषिक अकबर खान कय्युम खान (अली अल्लाना उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मलकापूर) यास प्राप्त झाले. तृतीय क्रमांक व १,००० रुपयांचे पारितोषिक साहिल शाह रहीम शाह (झेड. ए. उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मलकापूर) याने मिळवले. तसेच चतुर्थ क्रमांक व ५०० रुपयांचे पारितोषिक शेख फैझान शेख शरीफ यास मिळाले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उम्मत अकॅडमीचे अध्यक्ष लाल सर, मौलाना आझाद आरिफ शेख सर, आसिफ खान सर (झेड. ए. उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज), आसिफ अली खान सर (अली अल्लाना उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मलकापूर), हमीद खान सर (ज़ेड. पी. शाळा, कुर्हा) तसेच सय्यद असलम बागबान, अब्दुल सादिक, अक्रम शेख यांसह अन्य मान्यवरांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हाजी रशीद खान जमादार साहेब, रशीद खान जमादार, युसूफ खान, अजमतुल्ला खान, सनाउल्ला खान, शेख करीम भाई, जावेद कुरेशी, अक्रम भाई (मुर्गी वाले), इकबाल सेठ, जीकर मेमन आदी मान्यवर उपस्थित होते.
यांनी सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवून कौतुक केले.
उम्मत अकॅडमी मलकापूर
ईद मिलादुन्नबी मॅराथॉन
मलकापूर मॅराथॉन स्पर्धा
Z.A. उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज
अली अल्लाना उर्दू स्कूल मलकापूर
विद्यार्थ्यांची मॅराथॉन स्पर्धा
ईद मिलाद स्पर्धा 2025
मलकापूर विद्यार्थी क्रीडा स्पर्धा
मलकापूरची यशोगाथा
Eid Milad Marathon Malkapur