![]() |
जामोद येथे ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी |
पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणींचा संदेश, मिरवणुकीत भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
(जळगाव जा, बुलढाणा)
जामोद येथे 5 सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पैगंबर मोहम्मद सल्ल. अलै. वसल्लम यांच्या पंधराशे वर्षांच्या स्मरणार्थ गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
मिरवणुकीची सुरुवात जोहरीपुरा बंगला येथून झाली व मुजावरपुरा बंगला मार्गे पीर पोलाद दर्गा शरीफ येथे समारोप झाला. या मिरवणुकीत पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणी व विचार जनमानसापर्यंत पोहोचवून धार्मिक ऐक्य, बंधुता व शांततेचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी भाविकांना फळे व दुधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, जळगाव जा पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत नीचड, एपीआय नागेश मोहोड, बिट जमादार शेख इरफान, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान, शेख मजित, शेख असलम, शेख शब्बीर, साबीर पठाण, शेख माजीत मेम्बर, शरीफ खान, राजू मेकॅनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठ्या संख्येने भाविक, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.