![]() |
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे डॉ. वसंत हंकारे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन |
मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर हे महाविद्यालय केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठीही नेहमीच प्रसिद्ध आहे. या परंपरेला अनुसरून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी मिळावी यासाठी एक भव्य प्रेरणादायी व्याख्यान हे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकत आहेत. अभ्यासातील प्रगतीबरोबरच मानसिक तणाव, भविष्याबद्दलची चिंता आणि पालकांशी संवादातील दरी हे प्रश्न अधिक गंभीर होताना दिसतात. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आणि संघर्षातून यशाकडे कसे जायचे याविषयी योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या व्याख्यानासाठी विशेष वक्ते म्हणून प्रसिध्द प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मा. श्री. वसंत हंकारे सर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा प्रभावी वक्तृत्वशैली, जिव्हाळ्याचा संवाद आणि वास्तवाशी निगडित विचार हे तरुण पिढीला नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत. हंकारे सर “बाप समजून घेताना संघर्षाकडून यशाकडे” या अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. संघर्षाच्या माध्यमातूनच खरे यश प्राप्त होते आणि या प्रवासात पालकांची भूमिका अनन्यसाधारण असते, हे विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांमधून ठळकपणे उमगेल. पालकांचे महत्त्व ओळखून त्यांच्याशी संवाद साधणे, जीवनातील अडचणींना न घाबरता त्यांचा सामना करणे आणि यशाच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहणे यासाठी त्यांचे विचार विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी ठरणार आहेत.
या व्याख्यानाचे आयोजन मंगळवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले असून सकाळी ९.३० वाजता पदवी अभ्यासक्रमातील सर्व शाखांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता डिप्लोमा अभ्यासक्रमातील सर्व शाखांचे विद्यार्थी व्याख्यानाचा लाभ घेतील. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थी-पालक संबंध दृढ करण्यासही मोठी मदत करणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, तसेच आय क्यू ए सी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या व्याख्यानाचे आयोजन प्रा. नितीन खर्चे, प्रा. मो. जावेद सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले असून कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, तसेच सदस्य श्री. देवेंद्र पाटील, अनिल इंगळे, श्री. पराग पाटील सह डॉ. गौरव कोलते यांचा मोलाचा पाठिंबा लाभला आहे. व्यवस्थापनातील या मान्यवर व्यक्तींच्या सक्रिय सहभागामुळेच महाविद्यालयात असे उपक्रम सातत्याने राबवले जातात आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक बरोबरच चारित्र्य घडविणाऱ्या संधी उपलब्ध होतात.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल, अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांचा सामना करण्याची जिद्द वाढेल आणि संघर्षातून यशाचा मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास महाविद्यालयाने व्यक्त केला आहे. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर जीवनमूल्ये, संघर्षशीलता आणि पालकांचा आदर या बाबी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात किती महत्त्वाच्या आहेत हे अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच नवी दिशा देईल.