![]() |
शाळा सुटते चार वाजता... विद्यार्थ्यांना बस बस लागते सहा वाजता... दोन -दोन तास बस ची वाट पाहत ताटकळत बसावे लागत असल्याने |
शिवसेना (उबाठा) जिल्हा उपप्रमुख, पदाधिकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांसह आगारव्यवस्थापक कार्यालयात ठिय्या...
मलकापुर:- मोताळा तालुक्यातील माकोडी,टेंभी येथील 43 विद्यार्थी, विद्यार्थीनी मलकापुर शहरातील झेड. ऐ.उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, नूतन विद्यालया मध्ये शिक्षणासाठी येतात त्यांची शाळा सायंकाळी चार वाजता सुटत असून मलकापुर आगारात त्यांना बस सायंकाळी सहा वाजता लागत असल्याने दोन ते तीन तास ताटकळत बसावे लागते घरी जाण्यासाठी सायंकाळचे सात वाजत असून आईवडीलांचे टेन्शन वाढत असल्याने याबाबतची माहिती शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने आज विद्यार्थ्यांसह शिवसेना पदाधिकार्यांनी आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर यांचे कार्यालय गाठले, वाहतूक नियंत्रक सत्यजित सावकाश यांना उद्या बस वेळेवर न लागल्यास विद्यार्थ्यांना "भत्ता उपलब्ध करा आंदोलन" करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला.शिवसेनेच्या या अनोख्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने उद्या पासुन माकोडी बस सायंकाळी साडेचार वाजता वेळेवरच लावण्यात येणार असल्याचे वाहतूक नियंत्रक सत्यजित सावकाश यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, झेड ऐ उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, नूतन विद्यालया चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.