डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायद्याच्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नवीन नियम केंद्र सरकार लवकरच जाहीर करणार
By -Viral news live
September 19, 2025
0
डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायद्याच्या अंतर्गत
तयार करण्यात आलेले नवीन नियम केंद्र सरकार लवकरच जाहीर करणार
डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण नियमांचं काम अंतिम
टप्प्यात आलं असून येत्या काही दिवसांतच ते प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. एआय इम्पॅक्ट
समिट २०२६चं बोधचिन्ह आणि महत्त्वाच्या उपकरणांच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.
पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परिषद होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात एआय मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून विविध
क्षेत्रांमध्ये एआय सुविधा पोहोचायला याद्वारे मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं