सत्तेच्या विरोधातला 'आवाज' म्हणजे पत्रकार – प्रा. वाडेकर

Atik Khan
By -
0

(अतिक खान मुक्ताईनगर)

मुक्ताईनगर –
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती खडसे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने “डिजिटल युगात पत्रकाराची भूमिका व आव्हाने” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकमतचे पत्रकार व प्रा. विनायक वाडेकर (इच्छापुर निमखेडी बुद्रुक, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाळा) यांची विशेष उपस्थिती होती.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. वाडेकर यांनी पत्रकारितेच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, त्याने डोळसपणे वार्तांकन केले पाहिजे. पत्रकार हा समाजाचा बोलका नायक आहे. त्याचे ज्ञान अद्यावत व शब्द अर्थपूर्ण असले पाहिजेत. कारण पत्रकार समाजाचे व्यासपीठ असतो.”

पुढे त्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, “सत्तेच्या विरोधातला आवाज म्हणजे पत्रकार होय. पत्रकारातच समाजाचे व राष्ट्राचे प्रतिबिंब दडलेले असते, त्यामुळे त्याचे कार्य सदैव आव्हानात्मक असते.”

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. हेमंत महाजन म्हणाले, “आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचे भवितव्य आहे. डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहून कुटुंब, समाज आणि राष्ट्र अबाधित ठेवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.”

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, डॉ. वंदना चौधरी, तसेच प्रा. डॉ. विजय डांगे, प्रा. डॉ. इस्माईल शेख, प्रा. डॉ. दत्तात्रय कोळी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. प्रा. एस. एस. गवळी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. छाया ठिंगळे यांनी केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)