पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश अनिल खर्चे यांच्या ‘रिसर्च मेथडॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिटिकल टेक्निक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन

Viral news live
By -
0

मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर हे महाविद्यालय शैक्षणिक तसेच संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी नेहमीच ओळखले जाते. या परंपरेला पुढे नेत महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश अनिल खर्चे यांचे नवे पुस्तक “रिसर्च मेथडॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिटिकल टेक्निक्स” नुकतेच प्रकाशित झाले असून, संशोधन क्षेत्रात त्यांनी दिलेले हे मोलाचे योगदान विशेष दखलपात्र ठरले आहे.

आर. के. पब्लिकेशनमार्फत प्रकाशित झालेल्या या ग्रंथात संशोधन पद्धतींची मूलभूत तत्त्वे, डेटा संकलनाची साधने, परिमाणात्मक व गुणात्मक विश्लेषण, सांख्यिकी तंत्रे, डेटा अर्थ लावणे व संशोधनातील विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांचा सखोल ऊहापोह करण्यात आला आहे. एकूण ३०६ पानांचे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी तसेच अध्यापन क्षेत्रातील प्राध्यापकांसाठी एक उपयुक्त व मार्गदर्शक संदर्भग्रंथ ठरत आहे.या पुस्तकात सहलेखक म्हणून डॉ. रुचिता सुजई चौधरी, डॉ. प्रणव देसाई आणि डॉ. अर्चना धुरी यांचे योगदान देखील उल्लेखनीय आहे. विविध शाखांमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक नवी दिशा देणार असून, संशोधन प्रणालीबद्ध पद्धतीने करून विश्वासार्ह निष्कर्ष काढण्यास ते निश्चितच मदत करणार आहे.

महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील आणि सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी डॉ. युगेश खर्चे यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी तसेच सर्व विभागप्रमुखांनी या प्रकाशनाबद्दल डॉ. युगेश खर्चे यांचे अभिनंदन केले आहे.या प्रकाशनानंतर संशोधन क्षेत्रातील ही भर कोलते महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली असून, “रिसर्च मेथडॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिटिकल टेक्निक्स” हे पुस्तक विद्यार्थी व संशोधकांना निश्चितच नवी प्रेरणा आणि सशक्त मार्गदर्शन देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*