![]() |
सामाजिक कार्यकर्ते वाजिद कादरी यांनी केला आगळा वेगळा वाढ दिवस साजरा |
मलकापूर (निसार शेख) :- मलकापूर शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते वाजिद कादरी ह्यांनी त्यांच्या चाहत्या च्या आग्रहास्तव आपला वाढ दिवस साजरा करण्याचे ठरविले
याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर शहरातच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात परिचित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते वाजिद कादरी यांनी आपल्या चाहत्यांच्या आग्रह खातिर त्यांनी वाढ दिवस साजरा करण्याचे ठरविले ते पण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याचे ठरविले त्या अनुषंगाने शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले त्यामुळे त्यांनी विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप केले त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांना एक प्रकारे संदेश दिला की आपला वाढ दिवस साजरा करा पण आपली समाजा प्रति असलेली देणी लागते हे विसरता येत नाही
सामाजिक कार्यकर्ते वाजिद कादरी यांना लहानपणापासून आपल्या वडिलां कडून समाजकार्य करण्याचे बाळ कडू मिळाले आहे त्याचा उपयोग ते आपल्या जीवनात करत आहे. सामाजिक कार्य करणारे वाजिद कादरी हे समाज कार्य करण्यात सदैव अग्रेसर असतात त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्यांचा वाढ दिवस साजरा करण्याचे ठरविले पण वाजिद कादरी यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले की माझा वाढ दिवस हा एक आगळा वेगळा पद्धतीने साजरा करायचे आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले की शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करायचे आहे.तसे त्यांनी आपल्या वाढ दिवशी केले त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्यामुळे सर्वस्तरा वरुण त्यांचे कौतुक करण्यात आले . या वेळी हाजी रशिदखा जमदार , दिलीपभाऊ देशमुख, भाई अशांत वानखेडे, अनिल मुंधोकर, प्रमोद दादा अवसरमोल, रईस जामदार, ॲड जावेद कुरेशी , फिरोज खान, शहजाद खान, अत्ताऊर रहमान जमदार, राजूभाऊ वाडेकर, अनिल बगाडे, शिवराज जाधव, यांच्या सह सर्व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढारी यावेळी उपस्थित होते