अमडापूर: मन नदितील सपाट रस्ता ठरला तरुणांसाठी प्राण घातक, घसरून पडून तरूणाचा झाला मृत्यू
गावकऱ्यांची तात्काळ छोटा पूल बांधण्याची ग्रामपंचायत कडे मागणी
उदयनगर: येथून जवळच असलेल्या अमडापूर येथील ३५ वर्षीय तरुण नदी ओलांडून घरी परतत असताना . नदितील सपाट रस्ता हा शेवाळलेला असल्याने तरूणाचा पाय घसरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू मुखी पडला . मृत्यू झाल्या नंतर तरुणांचा मृतदेह बराच दूर वाहत गेला.हि घटना दि. २ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मन नदिच्या पात्रात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दुःख मय वातावरण पसरले.
याबाबत वृत्त असे की, अमडापूर येथील ३५ वर्षीय तरुण अरुण चिंधाजी वानखेडे हा दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी बुलढाणा येथे कामा निमित्त गेला होता. कामाचा निपटारा करून दुपारच्या सुमारास अरूण हा मन नदितील सपाट असलेल्या रस्त्याने शेवाळलेल्या पाण्यातून नदि ओलांडत असताना. शेवाळावरू पाय घसरून पडला. यामुळे त्याच्या डोक्याला पाठीमागून गंभीर दुखापत झाली. पाणी वेगाने वाहत असल्याने पाण्याने त्याला आत ओढल्याने नाका डोळ्यात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. खालच्या भागांमध्ये काही लहान लहान मुले मच्छीमारी करत होते. त्यांना अरुण मृत अवस्थेत वाहत येत असल्याचे पाहून त्यांचा गोंधळ उडाला हि माहिती त्यांनी तत्काळ परिसरातील लोकांना सांगितले, परिसरातील गावकऱ्यांनी धावत जाऊन अरुणचे प्रेत बाहेर काढून काठावर ठेवले ह्या घटनेची माहिती गावभर पसरताच गावकऱ्यांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती अक्षय संजय वानखेडे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी चिखली येथे पाठवला १७४ नुसार मर्गची नोंद घेतली आहे. सदर नदीपात्रातून गावकऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी नदि पात्रात सिमेंट काँक्रेट करून रस्ता बनवण्यात आला आहे. सदरचा रस्ता हा मोठ्या प्रमाणात व सतत पाऊस पडत असल्याने हा चांगलाच शेवाळला आहे. या रस्त्यावर अनेक शाळकरी मुलं व वयोवृद्ध गावकरी पाण्यातून ये-जा करतात. भविष्यात पुन्हा अशा जीव घेण्या घटना घडू नये म्हणून गावकऱ्यांनी या ठिकाणी पुलाची मागणी अमडापूर ग्रामपंचायत कडे केली आहे.