पुर्नाड फाट्यावर गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Viral news live
By -
0
पुर्नाड फाट्यावर गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
पुर्नाड फाट्यावर गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मुक्ताईनगर (अतिक खान) – मुक्ताईनगर शहराजवळील पुर्नाड फाटा येथे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत एमएच-40 सीडी-9358 क्रमांकाचा आयशर ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विमल गुटखा भरलेला आढळून आला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य शासनाने गुटख्याच्या विक्रीवर संपूर्ण बंदी असतानाही गुप्तपणे मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सध्या या प्रकरणी तपास करत असून, जप्त गुटखा कोणत्या ठिकाणी नेला जात होता याबाबत चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !