![]() |
मुक्ताईनगर येथे डीवायएसपी सुभाष ढवळे यांनी पदभार स्वीकारला |
मुक्ताईनगर अतिक खान – Viral News Live
गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) पदाचा अखेर भरती झाली आहे. नाशिक येथून पदोन्नतीवर आलेले सुभाष ढवळे यांनी सोमवारी मुक्ताईनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
यावेळी उपविभागीय कार्यालयात पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी श्री. ढवळे यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ढवळे यांच्या रुजू झाल्यामुळे मुक्ताईनगर उपविभागाला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बळकटी मिळणार असून नागरिकांकडूनही त्यांचे स्वागत होत आहे.