![]() |
जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा धरणगाव येथे पुरुष शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन |
मलकापूर प्रतिनिधी:- मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा धरणगाव येथे पुरुष शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थानी दिले निवेदन मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा धरणगाव येथे पूर्वी शिक्षक होते त्या सर्वांची बदली झाल्यावर सध्या धरणगाव येथे सर्व महिला शिक्षिका आहे जिल्हा परिषद मराठी शाळे मधील विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटक व मागास प्रवर्गातील आहेत त्यांचे आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलकीची असून सदर विद्यार्थी हा शाळेत गैरहजर असेल तर शिक्षक घरी जाऊन त्या विद्यार्थीच्या पालकांना मार्गदर्शन करत असत व विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येत आणि विद्यार्थ्यांकडून चांगली शैक्षणिक प्रगती करून घेत होते विद्यार्थ्यांच्या पालकासोबत ते सदैव चर्चा करणे नेहमी विद्यार्थ्यांची चौकशी करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे असे त्यांच्या पालकांना भेटीदरम्यान सांगत असत परंतु दर्जेदार शिक्षकांची बदली झाल्यामुळे ते शिक्षकांसोबत पालक चर्चा करू शकत नाही कारण सध्या शाळेमध्ये रुजू असलेल्या सर्व महिला शिक्षक आहे त्यामुळे पालक या महिला शिक्षिकां सोबत चर्चा करू शकत नाही. भविष्यात कोणतीही अडचणी निर्माण होऊ शकतात. आधीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांच्याकडून शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यासासह गृहपाठ चांगल्या प्रकारे करून घेत होते व सदैव विद्यार्थ्यांवर लक्ष देत होते त्यामुळे विद्यार्थी नेहमी शाळेत जात होते. सध्याची परिस्थिती पाहता बरेच विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंट पाठवण्यास तयार झाले त्यामुळे जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होऊ शकते. व शाळेचे गुणवत्ता ढासळू शकते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांकडून व शाळा व्यवस्थापन समितीकडून मागणी होत आहे