![]() |
काँक्रीट व नालीच्या कामावर नागरिकांचा प्रश्नचिन्ह, नियमबाह्य काम झाल्यास आंदोलनाची चेतावणी |
काँक्रीट व नालीच्या कामावर नागरिकांचा प्रश्नचिन्ह, नियमबाह्य काम झाल्यास आंदोलनाची चेतावणी
मलकापूर : प्रतिनिधी
नगरपरिषद मलकापूर मार्फत प्रभाग क्र. ८ मदार टेकडी, पारपेठ येथील अक्सा मशिदीच्या मागील गल्लीमध्ये सुरू करण्यात आलेल्या काँक्रीट व नालीच्या कामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजसेवक सगीर शाह नझीर शाह यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की हे काम शासन नियम व इस्टीमेटनुसारच पार पाडले गेले पाहिजे.
निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, या भागात अनेक वर्षांपासून कोणतेही विकासकाम झालेले नाही. आता कामाची सुरुवात झाल्याने नागरिकांची अपेक्षा आहे की ते पूर्णपणे दर्जेदार, पारदर्शक व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व्हावे.
सगीर शाह यांनी यावेळी इशारा दिला की, जर हे काम शासन नियम व इस्टीमेटच्या विरुद्ध झाले तर नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांचा इशारा आहे की, यावेळी जर कामात गडबड झाली तर ते गप्प बसणार नाहीत आणि संपूर्ण प्रशासनाला याची उत्तरे द्यावी लागतील.