बुलढाणा जिल्ह्यातील चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून त्यांची उकल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनिल अंबुलकर यांनी पथक तयार करून तपास सुरू केला. या पथकाने मलकापूर शहरातील जबरी चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करून दोन आरोपींना वरणगाव (जि. जळगाव) येथून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपशील
दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री फिर्यादी सौ. निकीता कार्तीक गोरे (वय 21, रा. श्रीराम कॉलनी, मलकापूर) आपल्या नातेवाईकांसह गणपतीचे दर्शन करून घरी परतत असताना अनंतकृपा फर्निचर गोडावून समोर दोन इसम मोटारसायकलवर आले. त्यापैकी चालकाने फिर्यादीच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची, अंदाजे 1,26,000 रुपयांची सोन्याची पोथ हिसकावून नेली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कारवाई आणि अटक आरोपी
स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करताना आरोपी हे वरणगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना पकडले. चौकशीत त्यांनी मलकापूर शहरासह नांदगाव (जि. नाशिक) येथे गुन्हे केल्याची कबुली दिली.
अटक आरोपी –
- अब्बास इबादात शेख (अली) ईराणी, वय 23, रा. भुसावळ, ह.मु. वरणगाव, जि. जळगाव
- साहिल हुसैन मोहम्मद ईज्जत अली जाफरी, वय 21, रा. बिदर (कर्नाटक)
जप्त मुद्देमाल
– बजाज पल्सर मोटारसायकल, किंमत 1,00,000 रुपये
गुन्ह्यांची उकल
– मलकापूर शहर पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा
– नांदगाव (जि. नाशिक) पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा
पुढील तपास
अटक आरोपींना मलकापूर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
कामगिरीत सहभागी अधिकारी
या कामगिरीत पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री. श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग नोंदविला. पथकात पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, मपोकॉ. आशा मोरे, चापोकॉ. निवृत्ती पुंड, शिवानंद हेलगे तसेच पोहेकॉ. राजू आडवे आणि पोकॉ. कैलास ठोंबरे यांचा समावेश होता.
