शहरात ईद ए मिलाद उत्साहात साजरी*

Atik Khan
By -
0

*मनमाड शहरात ईद ए मिलाद उत्साहात साजरी*


अतिक खान मुक्ताईनगर
मनमाड येथून
दी.8.09.2025 ईद-ए-मिलादनिमित्त मनमाड शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. जामा मशिदीपासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत युवकांनी हातात झेंडे घेऊन नात-शरीफ गात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. मशिदी व इमारतींवर आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे विविध समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे भाईचारा आणि धार्मिक एकतेचा सुंदर संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. पोलिस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने मिरवणुकीचा शिस्तबद्धतेने समारोप झाला.
मनमाड शहराचे पोलिस निरीक्षक विजय करे व सहाय्यक पोलिस उप निरीक्षक सय्यद साहेब यांचा कायदा व सुव्यवस्था राखून कुठलाही अनुचित प्रकार न घडू देता उत्फुर्सपणे सांगता केल्याबद्दल के.जी.एन. चैरिटेबल ट्रस्ट,जामा मस्जिद ट्रस्ट, व जामा मस्जिदीचे मौलाना असलम साहब रिझवी, हाजी मकसूद, मा.नगरसेवक सादिक पठान,मा.नगरसेवक अमजद पठान,मा.नगरसेवक बब्बू कुरैशी,अल्ताफ शाह,अतहर सय्यद,मोहसीन शेख,बाबा पठान,बशीर शेख, वसिम सय्यद,सईद शेख,कादिर शेख,यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*