![]() |
चांगदेव महाराज शासकीय आयटीआय उचंदे येथे पदवी प्रदान सोहळा संपन्न |
मुक्ताईनगर- प्रतिनिधी ।
चांगदेव महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उचंदे येथे उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आय.एम.सी. समिती सदस्य पुरुषोत्तम वंजारी यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर येथील श्रीकांत अरुण पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या संधी व कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन केले.
इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, पंप ऑपरेटर, मेकॅनिक, ड्रेस मेकिंग इत्यादी व्यवसाय प्रशिक्षणात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्राचार्य एम.बी. तायडे व आय.एम.सी. सचिव यांनी प्रशिक्षणार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रल्हाद निळे, एस.एम. गुरचळ, एच.डी. धायतडक, के.डी. नेमाडे, पी.एस. बावस्कर, एम.आर. लोखंडे यांसह संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.