![]() |
शेतकऱ्यांना पिक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने विनायक सरनाईक यांचा विमा प्रतिनिधींना घेराव... |
चिखली कृषी विभागात शेतकऱ्यांसह ठिय्या; जिल्हा प्रतिनिधीकडे वाचला समस्यांचा पाढा...
चिखली सन २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याप्रकरणी चिखली तालुक्याला सन २०२४-२५ साठी ६११५६ शेतकऱ्यांना अंदाजे १०८कोटी विमा रक्कम मंजुर झाली. ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्या टप्प्याने जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र 'थोडी खुशी जादा गम' अशीच परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात चिखली कृषी विभागात शेतकऱ्यांसमवेत विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना दि. २ सप्टेंबर रोजी घेराव घालण्यात आला.
रानअंत्री येथील शेतक-यांनी कमी जास्त मिळालेल्या दोन्ही शेतकऱ्यांचे पुरावे सादर केल्याने विमा ..तर विमा कार्यालयात ठोकणार मुक्काम विनायक सरनाईक
उर्वरित शेतकऱ्यांना विमा रक्कम अदा करा तसेच ज्यांना
कमी मिळाली त्यांचे सर्वेफॉर्म चेक करुन त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम द्या अन्यथा पुढिल आठवड्यात विमा कार्यालायत शेतकऱ्यांसह मुक्काम ठोकून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
प्रतिनिधी अनुत्तरीत झाल्याने या प्रकरणी जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून तुटपुंजी विमा रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांचे सर्वे फॉर्म वरील नुकसान क्षेत्र तपासुन उर्वरीत रक्कम मिळण्यासाठी तक्रार निवारण समितीची बैठक घेवून याबाबतचा कागदपत्रे आधारावरील प्रस्ताव जिल्हा समितीच्या माध्यमातून शासनास पाठविण्यात यावा, उर्वरीत राहिलेल्या व तुटपुंजी रक्कम मिळालेल्यांना पिक विमा देण्यात यावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. एकाच दिवशी क्लेम केलेत, सर्वे फॉर्मवर नूकसान सुद्धा एकच आहे, असे असतांना शेतकऱ्यांना पिक विम्याची तुटपुंजी रक्कम...
एकाला जास्त मात्र अनेकांना कमी रक्कम जमा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांकडून पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. प्रसंगी ज्या शेतकऱ्यांचे क्लेम झिरो दाखवत आहे त्यांची दोन दिवसात रक्कम अपलोड करण्यात येवून विमा रक्कम देण्यात येईल, सर्वे फॉर्म उपलब्ध करुन देण्यात येईल व याबाबतचा अहवाल समिती माध्यमातून पाठविण्यात येईल यासह विविध मागण्यांचे अश्वासन प्रशासनाने व जिल्हा प्रतिनिधी यांनी दिले आहे. यावेळी भरत जोगदंडे, रविराज टाले, राजू कुटे, लालसिंग मोरे, सौरव झाल्टे, नारायण झाल्टे, यांच्यासह रानअंत्री, अंबाशी व दिवठाणा येथील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कळू द्या रक्कम कमी का आली...
विमा कंपन्यांनी वितरित केलेली विम्याची रक्कम नेमकी कोणत्या निकषानुसार वितरित केली याची माहिती समोर येणे व शेतकरी बांधवापर्यंत जाणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सर्वेफॉर्म दिल्यास त्यावर एकून नुकसान क्षेत्र, बाधीत क्षेत्र दिसते मात्र कंपनीचे बिंग फुटेल यामुळे शेतकऱ्यांना ते दिले जात नसल्याचा आरोप सरनाईक यांनी केला.