![]() |
पारखेड फाट्यावर गुटखा तस्करीवर धडक कारवाई ₹50 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत |
बुलढाणा, दि. 4 सप्टेंबर –
स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा (स्थागुशा.) यांनी गुटखा तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवत पारखेड फाट्यावर गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला. या कारवाईत एकूण ₹50,35,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने गुटखा व सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेल्या बंदीनंतर अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी दिले होते. त्यानुसार पोनि. श्री. सुनिल अंबुलकर (स्थागुशा. बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
कारवाईचा तपशील
दि. 3 सप्टेंबर रोजी स्था.गु.शा. पथकाला माहिती मिळाली की, गुजरात राज्यातून एक कंटेनर वाहन गुटखा व पान मसाला घेऊन खामगांव शहराकडे येत आहे. त्यानुसार नांदूरा-खामगांव मार्गावरील पारखेड फाट्यावर सापळा रचून वाहन तपासणी करण्यात आली. या वेळी कंटेनरमधून शासन प्रतिबंधीत गुटखा आढळून आला.
जप्त मुद्देमाल:
- गुटखा – ₹25,35,000/-
- कंटेनर वाहन – ₹25,00,000/-
एकूण – ₹50,35,000/-
आरोपीची माहिती
- नाव : रामराज दुल्हारे (वय 48 वर्षे)
- रा. फतेपूर, उत्तरप्रदेश
आरोपीविरुद्ध पो.स्टे. खामगांव ग्रामीण येथे भा.दं.वि. कलम 274, 275, 123 सह अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26, 59 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास खामगांव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
या कारवाईत मा. निलेश तांबे – पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेश व मार्गदर्शन तसेच श्री. श्रेणिक लोढा – अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. अमोल गायकवाड – अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
पथकात पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, चापोकॉ. निवृत्ती पुंड (स्थागुशा. बुलढाणा) यांचा समावेश होता.