भारत आणि पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यभर निषेध आंदोलन

Viral news live
By -
0

भारत आणि पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यभर निषेध आंदोलन
भारत आणि पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यभर निषेध आंदोलन

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तानच्या संघात होणार असलेल्या सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यभर निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना दिली. माझं कुंकू, माझा देश असं हे निषेध आंदोलन असेल, या आंदोलनाअंतर्गत पक्षाच्या  महिला आघाडीच्या वतीनं प्रत्येक गावातून एका डब्यात कुंकवाच्या डब्या एकत्र करून ते डबे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहोत असं त्यांनी सांगितलं.  पहलगाम हल्याचे घाव अजूनही ताजे आहेत, त्यानंतर राबवलेलं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरु असल्याचं केंद्र सरकार म्हणत आहे, तरी देखील पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळला जातोय याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली.

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*