मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडी च्या ठिय्याआंदोलनाला आले यश

Viral news live
By -
0
मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडी च्या ठिय्याआंदोलनाला आले यश
मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडी च्या ठिय्याआंदोलनाला आले यश

मलकापूर प्रतिनिधी -: ग्राम झोडगा येथील आपादग्रस्त  कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही मदत मिळाली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रखर असे तहसीलदार साहेबांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आणि लेखी आश्वासन घेण्यात येवून , येत्या पंधरा दिवसात मदत करण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिले होते आणि त्या आंदोलनाचे फलित म्हणून आज  आपाद ग्रस्त झोडगे वासियांच्या खात्यात काल दिनांक 11 .09 2025 ला प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा झाली.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 25.04.2025 ग्राम झोडगा येथे अवकाळी पावसाने थैमान घालून भरपूर कुटुंब यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्या सर्व गोष्टींचा सरकारी पंचनामा झाला होता. परंतु तरीही कोणत्या प्रकारची आर्थिक मदत मिळत नव्हती. या सर्व बाबींची दखल *मलकापूर *तालुका अध्यक्ष अजय सावळे* आणि महासचिव भिमराव नितुने यांनी याबाबतीत तहसीलदार साहेबांना निवेदन दिले. तरीही आर्थिक मदत मिळत नव्हती म्हणून सर्व ग्राम वासियांनी ठीय्या आंदोलन केले. या सर्व बाबींची दखल घेऊन कर्तव्यदक्ष तहसीलदार राहुलजी तायडे यांनी या गोष्टीचा पाठपुरवठा करून आपादग्रस्त यांच्या खात्यात काल प्रत्यक्ष मदत जाहीर झाली. या सर्व बाबींमुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचा जयघोष केला. 

      या सर्व आंदोलनात  वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी रामभाऊ गवई , भाऊराव उमाळे,सुखदेव गव्हाळ, प्रतापराव बिराडे, निलेश इंगळे, अमोल भगत, निलेश भगत ,अजबराव वाघ, संजय झणके ,चंद्रभान झनके, जितू गवई ,गुड्डू सावळे, संजय वानखेडे, इलियाज खाजा ,अरविंद सोनवणे, मधुकर निकम ,अजय निकम आणि गावकऱ्यांतर्फे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते एस .एन. मोरे, भोनाजी मोरे, अमर सुरवाडे, मेजर शंकर आव्हाड, झोडगा येथील उपसरपंच कडू कोंगळे, सिद्धार्थ कोंगळे,एकनाथ अहिरे इत्यादी गावकर उपस्थित होते.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !