मलकापूर: लेवा समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात

Viral news live
By -
0
लेवा समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात
लेवा समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात

मलकापूर (7 सप्टेंबर): Viral News Live
लेवा शुभमंगल व लेवा युथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम भ्रात्रू मंडळ मलकापूर, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, दीपक टेन्ट हाऊस व परिसरातील शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने घेण्यात आला. अध्यक्षस्थान कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे सरांनी भूषविले.

कार्यक्रमाला श्री. डी. टी. खाचणे (अध्यक्ष बुलढाणा भ्रात्रू मंडळ), श्री. दिनकर नारखेडे, श्री. सुधीर पाचपांडे, डॉ. प्रफुल ढाके,श्री. बंडूभाऊ चौधरी, श्री. अमित नाफडे, श्री. हर्षल भंगाळे (अध्यक्ष लेवा युथ फोरम), श्री. हर्षल जावळे (लेवा शुभमंगल), श्री. अतुल महाजन (अध्यक्ष डोंबिवली शहर), श्री. अविनाश बोरले सर (प्राचार्य नूतन विद्यालय), सौ. निशा वराडे (अकोला) आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजातील विद्यार्थ्यांच्या व व्यक्तींच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. डॉ. मंजिरी नितीन खर्चे यांना संगणक क्षेत्रात डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल, तर डॉ. दीपक अशोक झोपे यांना भौतिकशास्त्र विषयात सीईटी परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोमल राणे, तुषार पाटील, राधिका पाटील, पूजा खडसे, अर्पिता खर्चे, अर्पित बढे अश्विन लोखंडे, विनय पाटील, रोशन भारंबे व सचिन फिरके या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

संजय खर्चे सर (बुलढाणा) यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. यावेळी आर. जी. चोपडे सर, कीर्ती ताई बोरले, वैशाली फालक, लीना येवले, अतुल महाजन, तेजस चौधरी, रमाकांत राणे, प्रा. साकेत पाटील, प्रा. गजानन सुपे, प्रा. नितीन खर्चे व प्रा. सचिन बोरले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*