चाकोरीबाहेरील मैत्रीणी कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

Viral news live
By -
0
चाकोरीबाहेरील मैत्रीणी कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
चाकोरीबाहेरील मैत्रीणी कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न


 कर्तृत्वशाली महिलांचा गौरव स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा २० सप्टेंबरला पनवेलमध्ये मनमुक्त फॉउंडेशनचा भव्य सोहळा 

नवी मुंबई (अतिक खान) सामान्यतेच्या चाकोरी मोडून अपार जिद्दीने स्वतःचा प्रवास घडवणाऱ्या महिलांचा गौरव करणे हे केवळ स्त्रीशक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून -मनमुक्त फाऊंडेशन तर्फे येत्या शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता सुरुची हॉल, पनवेल येथे चाकोरीबाहेरील मैत्रीणी, कृतज्ञता सोहळा हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम हा महाराष्ट्रातील श्रीशक्तीच्या प्रवासाला नवा आयाम देणारा हा उपक्रम ठरला. स्थापनेपासूनच मनमुक्त फाऊंडेशन ने मानसिक आरोग्य संवर्धन, विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन, युवक व्यक्तिमत्व विकास, अनाथ मुलांचे शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. "व्यक्त व्हा, रिक्त व्हा. मुक्त व्हा" या ध्येयवाक्याने सुरू झालेली ही चळवळ समाजातील उपेक्षित घटकांना नवजीवन देत आहे. याच सामाजिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या कार्याने समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या १० कर्तृत्ववान महिलांचा सामूहिक गौरव. घरगुती जबाबदाऱ्या, परंपरागत बंधने, आर्थिक मर्यादा आणि समाजातील दृष्टीकोन या साऱ्यावर मात करत या स्त्रियांनी स्वतःचा मार्ग

निर्माण केला. अशाच दहा प्रमुख सन्मानार्थीमध्ये मनीषा यादव, अनिता कोलते, गीता जुन्नरकर-राऊत, प्रतीक्षा वाडे, सुचित्रा घोगरे काटकर, नेहा दाबके, स्मिता गायकवाड, सुरेखा काटकर, संध्या गायकवाड आणि देवयानी गोविंदवार या महिलांचा विशेष उल्लेख आहे. त्यांचे कार्य वैयक्तिक यशापलीकडे जाऊन समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहे.

कृतज्ञता सोहळ्यास राज्यातील नामांकित व्यक्तिमत्त्वद्वारे सदर महिलांच्या या यशगाथांना मानाचा मुजरा करण्यात आला. तसेच मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन, महाराष्ट्र), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय), डॉ. वैशाली पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट) आणि ललिता बाबर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) आदी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळा अधिक वैभवसंपन्न झाला. हा कार्यक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून, समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरला. श्री ही घरापुरती मर्यादित नसून समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी शक्ती आहे, हा संदेश या सोहळ्यातून दिला गेला.

-मनमुक्त फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले की, "हा सन्मान म्हणजे स्त्रीच्या प्रवासाला दिलेला मान आहे. तिच्या संघर्षातले अश्रू, ओठांवरील हास्य आणि समाजासाठी केलेले कार्य, या साऱ्याला कृतज्ञतेची आदरांजली वाहण्याचा हा सोहळा होता. तसेच पनवेल शहराला या दिवसाचा एक प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार होण्याची संधी या माध्यमातून प्राप्त झाली. स्त्रीशक्तीचा गौरव करणारा हा सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला अभिमान आणि आत्मविश्वासाची नवी दिशा देणारा ठरला. तसेच सदर सोहळ्यातून मराठी भाषा, संस्कृती यांचेही दर्शन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांच्या पेहरावतून तसेच त्यांच्या बोलण्यातून झाले.

अशा प्रकारचे र्काक्रम व्हावेत ही मुळ संकल्पना डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांची होती. सदर सोहळ्यास मनमुक्त फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच सदर सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी ज्यांच्या प्रयत्नातून हा दैदिप्यमान सोहळा अतिशय भव्यरित्या पार पडला त्या म्हणजे मनमुक्त फाऊंडेशनच्या संचालक श्रीम. अस्मिता कालन, श्रीम. मनिषा कुन्हाडे तसेच श्रीम. मुक्ता भोसले यांचे भरभरून कौतूक केले. तसेच, मनमुक्तच्या या सोहळ्यास त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि मनमुक्तद्वारे होत असलेल्या अशा कार्याचा गौरव देखील केला. समाजातील सर्व स्तरांतील खीयांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून थोडासा वेळ काडून व्यक्त... रिक्त... मुक्त होण्याचे मार्गदर्शन मनमुक्तच्या विद्यापीठातून केले जाते.

या संपूर्ण सोहळ्याचे सुत्रसंचलन डॉ. पराग कालन व श्रीम. दिव्या भोसले यांनी अतिशय अन्द्भुतरित्या व सहजरित्या केले. तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यात घ्यावेत अशी इच्छा डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी मांडली. अशा प्रकारे असा हा दैदिप्यमान, वैभवसंपन्न, नाविण्यपूर्ण सोहळा पार पडला.
Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*