![]() |
मलकापूरात किसान ब्रिगेडची जाहीर सभा संपन्न |
मलकापूर – प्रतिनिधि।
शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची उकल करून आगामी दिशा ठरविण्यासाठी देशातील शेतकऱ्यांचे बाहुबली नेते रमेश टिकैत यांच्या उपस्थितीत १९ सप्टेंबर रोजी अकोला येथे ‘शेतकरी लुट वापसी संवाद’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज दि. १३ सप्टेंबर रोजी विदर्भाच्या प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर नगरीत छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालय येथे किसान ब्रिगेडच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते, लोकनायक व दैनिक देशोन्नतीचे संपादक मा. प्रकाशभाऊ पोहरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालयाचे अध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख, राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मिश्रा, किसान ब्रिगेडचे अध्यक्ष दिवाकर गावंडे, कार्याध्यक्ष शरदभाऊ वानखेडे, भगवंतराव गवळी, प्रदीप गावंडे, जिल्हाध्यक्ष अॅड. साहेबराव मोरे, रमेशसिंहदादा राजपूत, कॉ. दादा रायपुरे, सोपानभाऊ शेलकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोधर शर्मा, दादाराव पाथ्रीकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र वासुदेव पाटील, ज्ञा.ना. हिवाळे सर, रणजित डोसे, लहुजी गावंडे, माणिकराव संबारे पाटील, प्रकाश पाटील, प्रहार जनशक्तीचे अजय टप, हभप संभाजी शिकै, हभप कैलास धोरण महाराज, योगेश कडू पाटील, विलास शेळके, अॅड. दिलीप बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मलकापूर तालुका किसान ब्रिगेडच्या कार्यालयाचे उद्घाटन मा. प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते करण्यात आले. सभेस मोठ्या संख्येने मलकापूर, नांदुरा, मोताळा परिसरातील शेतकरी, शेतमजूर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.