जामनेर-पाचोरा पीजे रेल्वे भूसंपादन प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची शेतकऱ्यांशी बैठक

Viral news live
By -
0
जामनेर-पाचोरा पीजे रेल्वे भूसंपादन प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची शेतकऱ्यांशी बैठक
जामनेर-पाचोरा पीजे रेल्वे भूसंपादन प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची शेतकऱ्यांशी बैठक

जामनेर, अतिक खान |

जामनेर येथे आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भाजप कार्यालयात भेट देऊन रावेर लोकसभा क्षेत्रातील “पाचोरा-जामनेर” पीजे रेल्वे विस्तारीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जामनेर, पहूर व बोदवड परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.


सदर “पाचोरा-जामनेर-बोदवड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग” हा प्रकल्प “पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत” असून, यासाठी तब्बल ९५५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यातील १०० कोटी रुपये भूसंपादनासाठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


बैठकीत शेतकऱ्यांनी मागणी केली की, संपादनाची प्रक्रिया भूसंपादन कायदा २००८ नुसार न होता २०१३ च्या कायद्यानुसार मोबदला मिळावा. यावर प्रतिसाद देताना श्रीमती खडसे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या व अडचणी लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले.


तसेच, येत्या ८ दिवसांत रेल्वे बोर्ड अध्यक्षांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


 या बैठकीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, लवकरच रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !