![]() |
मलकापूर शहर पोलीस प्रशासन तर्फे गणेश उत्सव निमित्त प्रीती भोज साठी अवैध धंदेवाल्यांना आमंत्रित करणारा कर्मचारी कोण? अशी जनतेमध्ये चर्चा |
मलकापूर प्रतिनिधी :- मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दरवर्षीप्रमाणे विघ्नहर्ता गणेश याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते व त्याची विधिवत पूजा करून या गणरायाला विसर्जित करण्यात येते व या बंदोबस्ताच्या निमित्ताने सवड मिळाल्या नंतर पोलीस प्रशासनाद्वारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने दिनांक ९/९/२०२५ रोजी प्रीती भोज साठी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवानिमित्त प्रीती भोज चे आमंत्रण सर्व स्तरावर जसे पोलीस कर्मचारी, राजकीय पुढारी, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, पत्रकार बांधव, यांच्यासोबत मलकापूर शहरातील सर्व गणेश मंडळ चे सर्व पदाधिकारी यांना दरवर्षी प्रमाणे आमंत्रित करून या प्रीती भोज चा आनंद घेण्यात येतो परंतु यंदाच्या वर्षी वरील नागरिकांपेक्षा अवैध धंदेवाले प्रीती भोज साठी मोठ्या संख्येने आमंत्रित करण्यात आले होते त्यांना आमंत्रित करणारा तो पोलीस कर्मचारी की अधिकारी कोण? अशी चर्चा प्रीती भोजसाठी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये होती.
या लोकांना आमंत्रित करून पोलीस प्रशासनाला उपस्थित लोकांना काय दाखवायचे होते की या लोकांसोबत आमचे संबंध घट्ट आहेत व यांच्यावर आमचा कोणत्याच प्रकारचा रोष नाही. प्रीती भोज या कार्यक्रमांमध्ये महसूल कर्मचारी पोलीस कर्मचारी राजकीय पुढारी व पत्रकार यांच्यासोबत हे अवैध धंदेवाले मांडीला मांडी लावून प्रीती भोजचा आनंद घेताना दिसले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी याचा काय ? बोध घ्यावा या लोकांना ज्या कोणी पोलीस प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी असेल त्याने या लोकांना आमंत्रित केले त्याच्या या आमंत्रणाला पोलीस निरीक्षक यांची मुकसंमती तर नाही ना? असे प्रीती भोज च्या ठिकाणी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
कारण सर्वसामान्य नागरिकांमध्ये तसेच राजकीय पुढार्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची प्रतिमा एकदम निर्मळ असल्याची नागरिकांमध्ये व राजकीय लोकांमध्ये चर्चा आहे परंतु सदर जो कोणी कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी आहे त्याला पोलीस निरीक्षक साहेबांची प्रतिमा तर मलिंन करायची तर नाही ना? अशी प्रीती भोज साठी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये चर्चा ऐकायला मिळाली सदर ठिकाणी अशी पण चर्चा ऐकायला मिळाली मलकापूर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून आलेले एक कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांना याच गणेशोत्सवा दरम्यान कर्तव्य बजावत असताना राजकीय पुढाऱ्यांचा रोष पत्करावा लागला होता ही मलकापूर शहरातील सर्व सामान्य जनता विसरलेली नाही आहे.
तरी या प्रीती भोज कार्यक्रमांमध्ये अवैध धंदेवाले यांची उपस्थिती लाभल्यामुळे या प्रीती भोज कार्यक्रमाचे आयोजक हे लोक तर नव्हते अशी पण चर्चा प्रीती भोजेच्या ठिकाणी व शहरात बोलल्या जात आहे.पोलीस प्रशासनातील त्या कर्मचारी विरुद्ध पोलीस निरीक्षक किंवा वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात कारण अशा लोकांना खुले आम पोलीस स्टेशनमध्ये प्रीती भोजला आमंत्रित करणे म्हणजे ते आमचे नातेवाईक आहे असे त्या कर्मचाऱ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. तरी वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वसामान्य जनतेचे व राजकीय पुढारी यांचे लक्ष लागलेले आहे कारण काही दिवसांमध्ये राजकीय वातावरण तापणार असून असे कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असले तर शहरातील शांतता व सुव्यवस्थेला कधीही गालबोट शकतो तरी वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी चर्चा मलकापूर शहरात दबक्या आवाजात सुरू आहे