![]() |
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात स्वच्छतालय बांधावे मनसेची मागणी |
(अतिक खान) मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात तात्काळ स्वच्छालय व लघवीघर उभारण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिलेला आहे.
गेल्या सात महिन्यापासून मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी केली गेली .त्यापुढे स्वच्छालय व लघवी घर हटवल्या गेल्यामुळे पुरुषांना आणि महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुरुषांना सूर्या लॉज बाजूला लघवी घर आहे परंतु महिलांना लघवी घर मुळीच नाही त्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था महिला व पुरुष प्रवाशांची प्रवर्तन चौक मुक्ताईनगर मध्ये झालेली आहे. त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून मुक्ताईनगर नगरपंचायत चे सहाय्यक मुख्याधिकारी पंकज बावस्कर यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाद्वारे मनसेने इशारा दिलेला आहे.काही दिवसावर नवरात्र उत्सव सुरू होणार आहे खेड्यापाडयातून येणाऱ्या माता भगिनी शहरात दाखल होणार आहे स्वच्छालय व्यवस्था नाही त्यामुळे मानसिक ताण महिलांचा व पुरुषांचा वाढला आहे .दुर्गा देवीचा या आगमनाचा आपण आशीर्वाद घ्यावा अन्यथा प्रकोप सहन करावा लागणार आहे हे ध्यानात ठेवावे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळीच खपवून घेणार नाही दोन दिवसात स्वच्छालय किंवा लघवीघराची व्यवस्था करावी व्यवस्था झाली नाही तर प्रवर्तन चौक ते नगरपंचायत मुक्ताईनगर येथे भव्य मोर्चा निघणार असे मनसेचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी माहिती देताना सांगितले.याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष विनोद पाटील ,शहराध्यक्ष मंगेश कोळी ,सामाजिक कार्यकर्ता गजानन वडसकर ,प्रहार दिव्यांग सेना उपजिल्हाध्यक्ष उत्तम जुमडे आदी उपस्थित होते.