![]() |
कुऱ्हा परिसरात ढगफुटी; शेती, मार्केट व घरांचे मोठे नुकसान |
कुऱ्हा (अतिक खान) :
कुऱ्हा परिसरात आज पहाटे झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील शेती, बाजारपेठ तसेच घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिके, जनावरांचे चारा तसेच नागरिकांचे घरगुती साहित्य वाहून गेले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी स्थानिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गावातील नागरिकांनी एकत्र येऊन बचावकार्य सुरू केले असून, प्रशासनाकडून मदत व पंचनाम्यासाठी पथके रवाना झाली आहेत. अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कुऱ्हा परिसरात हाहाकार माजला आहे.