मूळ ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिकीट दिले तरच धनगर समाज मतदान करणार अन्यथा मतदान करणार नाही

Viral news live
By -
0
मूळ ओबीसीला स्थानिक  स्वराज्य संस्थांमध्ये तिकीट दिले तरच धनगर समाज मतदान करणार अन्यथा मतदान करणार नाही
मूळ ओबीसीला स्थानिक  स्वराज्य संस्थांमध्ये तिकीट दिले तरच धनगर समाज मतदान करणार अन्यथा मतदान करणार नाही

(अतिक खान मुक्ताईनगर) दि.१२/९/२०२५
. मुक्ताईनगर तालुका धनगर समाजाच्या बैठकीतील निर्णय.
      जय मल्हार सेनेचे प्रमुख समाजभूषण मा. लहुजी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तर महाराष्ट्र प्रमुख रवी भाऊ पवार, माजी नगरसेवक राजू हिवराळे, दिगंबर कारंडे, माधव जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे मुक्ताईनगर येथे तालुक्यातील धनगर समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा समाजाला लागू करण्यात आलेले हैदराबाद गॅझेट, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करणे, मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढपाळावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखरावर कडक कारवाई करून मेंढपाळांच्या मालमत्ता परत मिळवून देण्यात याव्यात या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून अनेक निर्णय घेण्यात आले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय पक्षांनी मूळ ओबीसींना तिकीट दिले नाही तर धनगर समाज मतदान करणार नाही असा ठोस निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 
महाराष्ट्रातील धनगर समाजालाअनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात, मेंढपाळांच्या वाड्यावर दरोडे टाकून मेंढ्या चोरणाऱ्या दरोडेखराला अटक करून कडक कारवाई करावी आणि मेंढपाळांच्या मेंढ्या तात्काळ परत मिळवून द्याव्यात. तसेच मेंढपाळ आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन असुरक्षित बनले असल्यामुळे त्यांना शासनाने स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना द्यावा. या मागण्यासाठी येत्या 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर जय मल्हार सेनेच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. 
बैठकीला गजानन कवडे, रवींद्र पाचपोळ, बाळू शिंदे, बाळाभाऊ चिंचोले, सुभाष कचरे, जितेंद्र जुमडे ,गजानन कवडे, विजय सावळे, नरेंद्र पवार, सचिन धनगर, तानाजी धनगर, विजय सावळे, भारत मदने,  सिताराम बिचकुले, शिवा झिटे ,शंकर केसकर, हिरामण येळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*