![]() |
मौजे हरताळे (मुक्ताईनगर) येथे आयोजित भाजपा मुक्ताईनगर व बोदवड मंडळ "सेवा पंधरवाडा 2025" कार्यशाळेस; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित... |
अतिक खान
*रावेर लोकसभा* अंतर्गत *मौजे हरताळे (मुक्ताईनगर)* येथे *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* व *भाजपा जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत बावस्कर* यांच्या प्रमुख उपस्थितीत *"सेवा पंधरवाडा 2025"* नियोजन बाबत *भाजपा मुक्ताईनगर व बोदवड मंडळ* यांची कार्यशाळा संपन्न झाली.
*माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी* यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते *महात्मा गांधी जयंती* दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत *भाजपा* मार्फत *“सेवा पंधरवाडा”* साजरा करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरे, "आत्मनिर्भर भारत" आणि "विकसित भारत" थीमवर चित्रकला स्पर्धा, शाळा, रुग्णालये आणि वाहतूक केंद्रांवर स्वच्छता मोहिमा. "नमो युवा रन" मॅरेथॉन, पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती: आत्मनिर्भर भारत अभियान, वृक्षारोपण "एक पेड मां के नाम" थीमवर, स्वच्छ भारत अभियान आणि गांधी जयंती मोर्चा वृद्धांसाठी सायकल वाटप, अपंगांसाठी सहाय्यक उपकरणे पुरविणे इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सदर कार्यशाळेत यावर सकारात्मक चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.
यावेळी *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह भाजपा जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत बावस्कर, श्री. राजेंद्र फडके, श्री. अशोक कांडेलकर, श्री. मधुकर राणे, जिल्हा सरचिटणीस श्री. परिक्षित बऱ्हाटे, श्री. प्रफुल जावरे, श्री. यश संचेती श्री.शिवराज जाधव तसेच मुक्ताईनगर व बोदवड मंडळातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्यने उपस्थित होते.