![]() |
अंतुर्ली येथे सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्टद्वारा आत्मऊर्जा शिबिर संपन्न |
जळगाव (अतिक खान)
सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट, अंतुर्ली यांच्या वतीने आत्मऊर्जा शिबिराचे आयोजन अंतुर्ली येथे करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध भागांतील शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला.
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेले मानसिक-शारीरिक विकार, स्ट्रेस, टेन्शन व एकटेपण यावर मात करण्यासाठी आत्मिक ऊर्जा हेच खरे साधन असल्याचे श्री देवनाथ महाराज यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आत्मऊर्जा प्राप्तीचे विविध उपाय, निसर्गाशी जोडले जाण्याचे मार्ग व स्वतःशी कनेक्ट होण्याचे महत्त्व शिबिरार्थींना समजावून सांगितले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. गवरीवर बट्ट्या शिकणे, कच्ची केळी गवऱ्यांवर भाजून खाण्याचा आनंद, तसेच शेतात वनभोजनाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. याशिवाय शिरोधारा व बस्ती सारख्या आयुर्वेदिक चिकित्सांचा अनुभवही त्यांना देण्यात आला, ज्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत झाले.
शिबिरार्थींनी या उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला व आत्मऊर्जेचा अनुभव घेतल्याचे सांगितले. सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्टकडून अशा शिबिरांचे आयोजन पुढेही सातत्याने केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.