![]() |
सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांना युवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले |
मलकापूर (शेख निसार) :- महावीर इंटरनॅशनल नाशिक या संस्थे कडून दर वर्षी सामाजिक, आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांना युवा रत्न पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने यंदाचा युवा रत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते महेश मोतीलाल पाटील यांना जाहीर करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महावीर इंटरनॅशनल नाशिक या संस्थे कडून श्री पार्श्व पद्मावती मंदिर, सभागृह तवली फाटा, पेठरोड, नाशिक येथे युवारत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्या मध्ये महावीर इंटरनॅशनल नाशिक या संस्थेचे अध्यक्ष अनिलजी नहार, पुणे येथील प्रसिद्ध गायक तरुण मोदी, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप टाटीया, सेक्रेटरी जव्हेरीलाल घिया यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते महेश मोतीलाल पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन या वर्षाच्या युवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महेश पाटील यांनी समाजकार्याची पद्युत्तर पदवी घेतलेली असून गेल्या १२ वर्षापासून धुळे व नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सास्कृतिक, युवकल्याण, पर्यावरण, वृक्ष दिंडी, राष्ट्रीय एकात्मता, हुंडाबळी, एड्स जनजागृती, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड शिबिरे, कैदी बांधवांसाठी धुळे कारागृहात गांधी विचार परीक्षा तसेच महामानवांच्या जीवनकार्यावर आधारित परीक्षांचे आयोजन अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन, माहिती अधिकार कायद्यांतर्गत सरकारी कार्यालयातील अनागोंदी कारभारावर अंकुश ठेऊन अनेक गोर गरीब जनतेला सरकारी योजनाचा लाभ मिळवून दिला आहे, तसेच महाविद्यालयीन व किशोर वयीन युवक-युवती यांच्या साठी विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करून सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे.
महेश पाटील हे अनेक सामाजिक संस्था व संघटनांच्या कार्यकारणीवर असून उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र प्रमुख – अखिल भारतीय कला साहित्य संस्कृती अकादमी, वर्धा. अध्यक्ष – धुळे महानगर युवा संसद, कार्याध्यक्ष – बेरोजगार क्रांती महासंघ, सरचिटणीस – ओ.बी.सी शिक्षक पालक संघटना, कार्यक्रम आयोजक – जिल्हा उद्योग केंद्र, जनसंपर्क अधिकारी – मी धुळेकर संघटना, सदस्य – अंधश्रद्धा निर्मुलन समिती, अश्या अनेक संस्थांवर कार्यरत आहेत.
महेश पाटील यांनी दिलेल्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार, राष्ट्रीय राजीव गांधी इंडिया गौरव पुरस्कार. वर्धा, राज्यस्तरीय आण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार. छत्रपती संभाजी नगर, खान्देश सेवा कृतज्ञता पुरस्कार. धुळे, राज्यस्तरीय दक्ष नागरिक पुरस्कार. मुंबई, आदर्श केंद्र संचालक पुरस्कार. नाशिक, युवा मार्गदर्शन पुरस्कार. धुळे, युवा समाजरत्न पुरस्कार. नंदुरबार, राज्यस्तरीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार. मुंबई, राज्यस्तरीय महात्मा फुले स्मृती पुरस्कार, युवा चेतना पुरस्कार. जळगाव, अश्या अनेक संस्था संघटनांनी त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
महेश पाटील युवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्योजक विजय वेदमुथा, उद्योजक निरंजन भतवाल, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर, नैसर्गिक मानव अधिकार फोरमचे डायरेक्टर गोरख देवरे, साहेबराव वाघ, सुभाष दराडे, किरण धुमाळ यासह धुळे व नाशिक शहरातील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
फोटो कॅप्शन – महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षाचा युवा रत्न पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष अनिलजी नहार, पुणे येथील प्रसिद्ध गायक तरुण मोदी, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप टाटीया, सेक्रेटरी जव्हेरीलाल घिया यांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वीकारतांना महेश मोतीलाल पाटील