![]() |
मुक्ताईनगर तालुका खो-खो स्पर्धेत आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमक |
अतिक खान मुक्ताईनगर
मुक्ताईनगर : तालुकास्तरीय 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या खो-खो स्पर्धा मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल च्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुला-मुलींनी उपविजेतेपद पटकावून शाळेचा मान वाढविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम यांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या पूजनाने व श्रीफळ फोडून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्ये तालुका क्रीडा समन्वयक संजीव वाढे, तालुका क्रीडा कार्यालय समन्वय ज्ञानेश्वर येवले, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक नितीन पवार, मुख्याध्यापिका सरला पाटील, पर्यवेक्षक लीना रडे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेत तालुक्यातील आठ शाळांचे संघ सहभागी झाले होते. मुलांच्या गटात जे. ई. स्कूल मुक्ताईनगर यांनी विजेतेपद पटकावले, तर एम. एन. नारखेडे विद्यालय रुईखेडा यांनी उपविजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात एम. एन. नारखेडे विद्यालय रुईखेडा विजेता ठरले, तर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर उपविजेता ठरले.
खेळाडूंच्या उत्साहवर्धनासाठी व त्यांच्या कामगिरीबद्दल तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत काळे यांनी केले.