नायगाव, ता. मुक्ताईनगर (जि. जळगाव) – येथील रहिवासी व सेवानिवृत्त महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच श्रामणेर/बौद्धाचार्य आयु. रघुनाथ नागो पोहेकर (वय ८१) यांचे दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
आपल्या सेवाकाळात त्यांनी पोलीस खात्यात प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली. निवृत्तीनंतर त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य समर्पित केले. विविध ठिकाणी बौद्धाचार्य व मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व शिस्तप्रिय, प्रगल्भ विचारांचे व समाजहिताचा सतत विचार करणारे होते.
त्यांच्या निधनाने नायगाव व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, तीन मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते प्रमोद पोहेकर व मनोज पोहेकर यांचे वडील होत.