संघटनात्मक संरचनाच मुक्ती आंदोलनाला समाजात रुजवेल – राजेश पवार

Viral news live
By -
0
संघटनात्मक संरचनाच मुक्ती आंदोलनाला समाजात रुजवेल – राजेश पवार
संघटनात्मक संरचनाच मुक्ती आंदोलनाला समाजात रुजवेल – राजेश पवार


महाविहार मुक्ती आंदोलनाचे जळगाव – बुलढाणा संयुक्त अधिवेशन संपन्न

मुक्ताईनगर प्रतिनिधी :
जागतिक बौद्धांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या बिहारमधील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जगभरात सुरू असलेल्या आंदोलनांना संघटनात्मक चौकट लाभल्यासच यश मिळू शकते, असे प्रतिपादन मुंबई विभागाचे मुख्य समन्वयक राजेश पवार यांनी केले.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध जनजागृती अभियान समिती, महाराष्ट्र राज्य यांचे जळगाव व बुलढाणा जिल्ह्यांचे संयुक्त अधिवेशन तालुक्यातील डोलारखेडा येथे पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख रविंद्र हिरोळे यांनी भूषवले.

या प्रसंगी मराठवाडा विभाग समन्वयक सत्यजीत साळवे (छ. संभाजीनगर), संविधान प्रचारक सुभाष कांबळे (ठाणे), प्रदेश संघटक दिलीप इंगळे, बुलढाणा जिल्हा संघटक सुशील इंगळे, ज्येष्ठ पत्रकार मोहन मेढे, निवृत्त मेजर विनोद लहासे, मीडिया प्रभारी निवृत्त मेजर रतन डोंगरदिवे, देवानंद जाधव व सम्राट अशोक सामाजिक संघाचे अशोक निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिवेशनात सत्यजीत साळवे यांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास सविस्तर मांडला. तर मोहन मेढे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील आंबेडकरी व धम्म चळवळीचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात रविंद्र हिरोळे यांनी भीमा-कोरेगावच्या शूरवीरांचा संघर्ष स्मरून महाराष्ट्राने एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. राहुल लहासे यांनी केले तर आभारप्रदर्शन पंकज रोटे यांनी मानले.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ थाटे, शिवाजी वानखेडे, दुर्योधन सुरवाडे, सुरेश इंगळे, बाळू इंगळे, भरत वानखेडे, शिवाजी इंगळे, गणपत इंगळे, अनिल वाघ, पंकज हिरोळे, सुनील खराटे, राहुल इंगळे, प्रशांत हिरोळे, विनोद मोरे, अतुल हिरोळे, गौतम वाघ, आशिष हिरोळे, किशोर निकम, राजू निकम, अरुण वानखेडे, विनायक हिरोळे, आदित्य इंगळे तसेच धम्म उपासिका महिला मंडळाने परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*