![]() |
तिर्थक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे श्रीसंत मुक्ताबाई जन्मोत्सव सोहळा साजरा __ हजारो महिला भाविकांची उपस्थिती |
संदीप जोगी मुक्ताईनगर.....
संत निवृत्तीनाथ ,संत ज्ञानेश्वर ,संत सोपानदेव या भावंडांमध्ये अतिशय लडिवाड असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत आपल्या परखड अभंग वाणीतून थोर कवयित्री म्हणून ओळख असणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा अश्विन मासातील नवरात्र उत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना दिनी अवतीर्ण झाल्या
आदिशक्ती मुक्ताई यांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निश्चय करून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तापी पूर्णा परिसर सेवेकरांतर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई चंडी सेवा अंतर्गत सामूहिक दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते . या सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो सेवेकरी तसेच संत मुक्ताई फळावरील वारकरी टाळकरी फडकरी कीर्तनकार भाविक मंडळी सहभागी झालेले होते. दुर्गा सप्तशती पाठाच्या प्रत्येक अध्याय ला मुक्ताई अष्टक वाचन झाले. श्री संत मुक्ताई यांच्या चरित्र गाथेतून त्यांच्या जन्मोत्सवाचा अध्याय वाचून आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात पुष्पवृष्टी करून संत मुक्ताई साहेबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यासाठी श्री संत मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज ,ह भ.प. उद्धव महाराज जुनारे , ह भ प विशाल महाराज खोले , पंकज महाराज, श्री स्वामी समर्थ सेवेकरी पुरुषोत्तम वंजारी, सुधीर कुलकर्णी, कुणाल महाजन, अमरदीप वराडे,के.वाय. चौधरी , शेखर पाटील, संतोष पाटील , ह भ प पंकज महाराज , ज्ञानेश्वर हरणे , स्वामी समर्थ सेवेकरी , भाविक यांनी सहकार्य केले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील देखील उपस्थित होते.
संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळी आणि ज्ञान सेवा प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने संत मुक्ताई जन्मोत्सवानिमित्त अभंग निरूपणमाला यामध्ये ताटीचे अभंग या विषयावर वक्त्या अर्पणाताई परांजपे यांचे व्याख्यान झाले.