वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हास दरमहा १५ हजार रुपये हप्ता दयावा लागेल. ___ १२ हजाराची लाच घेताना अंमळनेर येथील दोघे पोलिसांसह खाजगी इसम यांना अटक

Viral news live
By -
0
संदीप जोगी मुक्ताईनगर.... 
वाहनामध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दरमहा पंधरा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल त्यापैकी 12,000 रुपयाची लाच स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचारी व एका खाजगी इसमास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केल्याची घटना घडलेली आहे.



तक्रारदार हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडर मधुन कॉम्प्रेसर मशीनच्या सहायाने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. सदरचा व्यवसाय करत असतांना अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे हे तकारदार व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी येवुन तकारदार यांना "तुला वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हास दरमहा १५ हजार रुपये हप्ता दयावा लागेल, नाहीतर तुझ्यावर अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल करतो." असे सांगुन तकारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.२३ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात येवुन समक्ष तकार दिली होती.

सदर तक्रारीची  २३  सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता पाटील व निकुंभे यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १२ हजार रुपये   खाजगी इसम उमेश बारी यांच्या हस्ते   स्विकारण्याचे मान्य केले होते.
याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुरनं. /२०२५
भ्र.प्र. कायदा कलम ७ व १२ प्रमाणे,  २४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेला आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. धुळे ,सापळा अधिकारी
पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यांचे सह सापळा पथकामध्ये यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक ,पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा,पोकॉ. प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर
हे होते. मार्गदर्शन म्हणून  भारत तांगडे पोलीस अधीक्षक , माधव रेडडी अपर पोलीस अधीक्षक
 सुनिल दोरगे अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
यांचे होते.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*