![]() |
मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी सह मुलगा जागीच ठार तर १ मुलगा बचावला. |
देव दर्शनासाठी जाताना काळाने घातला घाला
संदीप जोगी मुक्ताईनगर....
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील मुरूम भरलेल्या डंपर वरील चालकाने सुसाट वेगाने हलगर्जीपणाने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी सह लहान मुलाचा ही जागीच चिरडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडली. डंपर हे बी एन ए इन्फ्रास्ट्रक्चर यांचे असल्याचे दिसून आले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील सर्वजण आठ ते दहा फूट फरकट गेले होते . मयता मध्ये नितेश जगतसिंग चव्हाण वय 32 , सुनिता नितेश चव्हाण वय 25, शिव नितेश चव्हाण वय ७ यांचा समावेश असून निहाल सिंग नितेश सिंग चव्हाण वय 10 हा मुलगा जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. सर्व राहणार मातापुर तालुका डोईफोडिया जिल्हा बुऱ्हानपूर ( मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत. सध्या ते जळगाव येथे वास्तव्यात असून इच्छापूर् मध्य प्रदेश मधील देवीच्या दर्शनासाठी ते कुटुंबासह निघालेले होते परंतु रस्त्यातच काळाचा घाला त्यांच्यावर ओढवला गेला.
छत्रपती संभाजी नगर ते इंदोर पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ अंडरपास पूलाचे काम चालू आहे. बी एन अग्रवाल हे ठेकेदार हे काम करीत आहे. या रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याचे काम सुरु आहे. 26 रोजी शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान खडी भरलेला डंपर क्रमांक MH19 CX2038 वरील चालकाने भरधाव वेगात चालवत येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MP 48 ML2695 यांचा जोरदार अपघात झाल्याने यामध्ये पती-पत्नी व मुलगा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला होता.
एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी चालकास चोप दिला. तर डंपरची केबिन नागरिकांनी जाळून टाकली . सदरील डंपर बी. एन. अग्रवाल यांचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशाच प्रकारे डंपर चालक बेसावध जोरात डंपरची वाहतूक करताना या रस्त्यावरून नेहमीच दिसत असतात असे नागरिकांमधून बोलले जात आहे यावर प्रशासनाने चाप बसवण्याची गरज आहे डंपर चालकांची मनमानी या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संतप्त जमावाने ट्रकला जाळण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, वरणगाव ,बोदवड, मुक्ताईनगर पोलीस ठाणे व उपविभागीय अधिकारी कार्यालय मुक्ताईनगर येथील कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. तसेच फॉरेन्सिक लॅब चे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
डंपर चालकाविरोधात गुन्हा....
अपघातस्थळी पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकार्यांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. अपघात प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गौण खनिजाची वाहने सुसाट....
मुक्ताईनगरसह परिसरात गौण खनिज वाहतूक करणारे वाहने सुसाट धावत असून या वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. आरटीओ प्रशासनासह महसूल व पोलिस प्रशासनाने आपले अस्तित्व दाखवून मुजोर वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी माफक अपेक्षा तालुकावासी व्यक्त करीत आहेत. गौण खनिज वाहतूकदारांना राजाश्रय लाभला असल्याने त्यांची हिंमत दिवसागणिक वाढत चालल्याचा आरोप होत आहे.