![]() |
लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये नवरात्रीचा रंगतदार उत्सव |
संदीप जोगी मुक्ताईनगर....
लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये नवरात्रीचा उत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देवीची नऊ रूपे साकारली – शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिधात्री. आकर्षक वेशभूषा आणि श्लोक पठणामुळे संपूर्ण शाळा भक्तिमय वातावरणाने उजळून निघाली.
शाळेच्या प्रांगणात मुलांसाठी खास पंडाल तयार करण्यात आला होता. नियोजनबद्ध पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत पारंपरिक पोशाख परिधान करून उत्साहात गरबा व दांडिया खेळला. या उपक्रमात पालकांनीही सक्रिय सहभाग घेतल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला.
या कार्यक्रमाला प्राचार्य योगेश पाटील, अध्यक्ष कविता प्रदीप पाटील, सचिव रेखा संतोष इंगळे तसेच संचालक मुरलीधर त्रंबक पाटील व सुनील वसंतराव पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून त्यांचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. यात अपेक्षा दाते, अर्चना दहीभाते, सोनाली पाटील, लक्ष्मी खोडे, करिश्मा काहाते, सुरेखा धनगर, रेखा कांडेलकर, जया कांडेलकर, कोमल राठोड, स्वाती इंगळे व वैशाली सोनावणे यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच शिपाई विनायक पाटील व कर्मचारी विनोद निशाणकर, रमेश राठोड यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा व एकोप्याचे महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील आयुष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.