पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत |
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पीके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, मका व भुईमुग या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचिविण्यासाठी सातारा जिल्हयात पीक प्रात्याक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी गटांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. पीक प्रात्याक्षिकांकरीता कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे 31 मार्च, 2024 पुर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांच्यामार्फत शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. गटाने प्राधिकृत केलेल्या सदस्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जास्तीत जास्त शेतकरी गटांनी विविध पिकांच्या पिक प्रात्याक्षिके या घटकासाठी अर्ज करावेत व लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा