![]() |
ईद मिलादुन्नबी निमित उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप... |
मुक्ताईनगर(अतीक खान) मुक्ताईनगर येथील ईद मिलादुन्नबी समिती च्या वतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर (स) यांच्या जयंती निमित फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बाबत सविस्तर वृत असे की, मुक्ताईनगर येथील ईद मिलादुन्नबी समितीच्या वतीने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब जयंती निमित मुक्ताईनगर चे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णा फळ वाटप करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब खान, मानवाधिकार संघटना चे मोहन मेढे, मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी,सुन्नी मनियार मस्जिद ट्रस्ट चे मुतवाली कलीम मनियार, अकिल मनियार, अहमद ठेकेदार, तसेच केजीएन ग्रूप चे आरशन मनियार, मुजमिल मनियार, जुनेद मनियार, शाकीर मनियार, आवेश मनियार, खलीक मनियार, वसीम मनियार, इलियास मनियार, नदीम मनियार, फैजान मनियार, कारी कलीम रजवी, मुबाशीर अहमद आदी उपस्थित होते.