![]() |
कोलते महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाचा औद्योगिक भेटीचा उपक्रम |
मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी उद्योगजगताची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. ही भेट जळगाव येथे नुकतीच रोजी पार पडली.
या उपक्रमांतर्गत दोन नामांकित उद्योगांना भेट देण्यात आली. पहिली भेट राम अँटीव्हायरस, जळगाव येथे घेण्यात आली. ही भेट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग व सायबर सिक्युरिटी या विषयांशी निगडीत होती. विद्यार्थ्यांना अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची कार्यपद्धती, धोके शोधणे व काढून टाकणे, मालवेअर विश्लेषण, प्रत्यक्ष सायबर सुरक्षा तंत्रे, तसेच अँटीव्हायरस विकासासाठी वापरली जाणारी साधने व तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन मिळाले. तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रातील सद्य प्रवाह आणि आव्हाने यांची माहिती देण्यात आली.
दुसरी भेट पॅशन सॉफ्टवेअर सोल्युशन्स, जळगाव येथे घेण्यात आली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर विकास प्रक्रिया, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, क्लायंटच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर सोल्युशन्स कसे तयार केले जातात, याची सविस्तर माहिती मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव यामध्ये सेतू निर्माण करण्याची मौल्यवान संधी मिळाली.
या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सुदेश फरफट यांनी विद्यार्थ्यांना या भेटीचे महत्त्व समजावून सांगितले. विभागातील प्राध्यापक प्रा. अंकुश नारखेडे, डॉ. मंजिरी करांडे, प्रा. दीप्ती लाढे, प्रा. शिवानी खेड़कर यांनी या भेटीचे नियोजन व समन्वय करण्यात परिश्रम घेतले.महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते आणि खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व सॉफ्टवेअर विकास या क्षेत्रातील वास्तव अनुभव घेण्याची संधी मिळाली असून त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची दिशा ठरवण्यासाठी व उद्योगजगताशी जोडले जाण्यासाठी अशा उपक्रमांचे मोलाचे योगदान आहे, असे प्राचार्य यांनी सांगितले.