![]() |
दुतोंडी साप, कासव व अन्य वन्य प्राण्यांचे तसेच नकली नोटा चे आमिष दाखवत पर राज्यातील लोकांना जंगलात बोलून लूटमार करणाऱ्या सहा आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांनी केले जेरबंद |
संदीप जोगी मुक्ताईनगर...
मोबाईल फोन मध्ये असलेल्या दोन तोंडी साप मांडूळ कासव व अन्य वन्य प्राण्यांचे तसेच नकली नोटा बाबतचे व्हिडिओ बाळगून तसेच प्रसार माध्यमांवर पाठवून पर राज्यातील लोकांना मुक्ताईनगर तालुक्यातील जंगल परिसरात बोलावून त्यांच्याकडे मौल्यवान वस्तू काढण्याच्या व दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना 24 सप्टेंबर रोजी रात्री दहा ते साडेबारा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाटा ते पूर्ण टा दरम्यान घडली.
याबाबत अधिकृत असेही मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णांड तपासणी नाकाजवळ वाहतूक पोलीस यांना वाहनांची तपासणी करीत असताना आरोपी त्यांच्या मोबाईल फोन मध्ये असलेल्या दोन तोंडी साप मांडूळ कासव व वन्य प्राण्यांचे तसेच नकली नोटा बाबतचे व्हिडिओ बाळगून तसेच प्रसार माध्यमावर पाठवून पर राज्यातील लोकांना मुक्ताईनगर तालुक्यातील परिसरातील जंगलामध्ये बोलून त्यांना सदरच्या वस्तू देण्याचे अमित टाकून व त्यांच्याकडील परो रक्कम दाग दागिने त्यांच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पवन दिनेश गौर राहणार आडगाव खुर्द तालुका हरदा जिल्हा हरदा अरविंद कुमार काशीराम राठोड राहणार हरदा जिल्हा हरदा राजेश शंकरलाल साहू राहणार शाहपुर जिल्हा बऱ्हाणपूर चेतन सुरेश श्रीवास्तव राहणार लालबाग बऱ्हाणपूर गोपाल श्रीराम यादव राहणार शिवनी माधवा तालुका नर्मदापुर मध्य प्रदेश चेतन गोविंद यादव राहणार न्यू कॉलनी बऱ्हाणपूर या सर्वांना मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.