महालक्ष्मी उत्सवाचे उद्या होणार विसर्जन .
किन्होळा: विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर विशेष करुन महिला भाविकांना ज्येष्ठा गौराईच्या उत्सवाचे वेध लागतात. ज्येष्ठा गौराईचे भक्ती भावात घराघरात आगमन झाले. यंदा ज्येष्ठा गौराई उत्सवाला ३१ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. तीन दिवस हा उत्सव श्रद्धा पूर्वक जिल्ह्यातील सर्वच भागात साजरा करण्यात येत आहे.
ज्येष्ठा गौराईचे आगमन झालेल्या घराघरात १ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे. या प्रसादासाठी आप्तेष्ट, शेजारी व मित्र मंडळींना आमंत्रण देण्यात येते. अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे. महालक्ष्मीचे दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित राहतात. ३१ सप्टेंबर रोजी बहुतांश घरामध्ये ज्येष्ठा गौरीचे भक्ती भावात सोन पावलांनी आगमन झाले. यावेळी गौराईची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. गौराईचे आगमन झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात ज्येष्ठा कनिष्ठा गौराईचे आगमन होते. गौरीला माहेरवाशिणी म्हटले जाते.
घरोघरी विराजमान झालेल्या गौराई.
गौराईच्या रुपात पार्वती आपल्या बाळाला म्हणजेच गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते, अशी आख्यायिका आहे. गौराई घराघरात विराजमान होवून दोन दिवस पाहुणचार घेते. पहिल्या दिवशी आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन व तिसऱ्या दिवशी या उत्सवाची सांगता करण्यात येते. ज्येष्ठा गौराई घराघरात विराजमान झाल्या आहेत. ३१सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौराईचे पूजन करण्यात आले तर ०२ सप्टेंबर रोजी या उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. सांगता उत्सवावेळी अनेक ठिकाणी महिलांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.