![]() |
| खड्डे चुकवताना वाहनधारकांची तारेवरची कसरत, संबंधित अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींनी लक्ष देतील का? |
(अतिक खान)मुक्ताईनगर
मुक्ताईनगर पूर्णड फाटा ते डोलारखेडा रस्ताची दयनीय अवस्था झाली असून रस्तावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. वाहनधारकांना खड्डे चुकवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. मुक्ताईनगर व बऱ्हाणपूर कडे येथे ये-जा करणाऱ्या वाहनधारक, तसेच प्रवासी व या भागातील शेतकरी नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे दुई सुकळी डोलारखेडा चिचखेडा मालखेडा निमखेडी कुऱ्हा या गावांकडे जाण्यासाठी एकमेव पर्यायी रस्ता असल्याने नेहमीच या मार्गावर वर्दळ असते. परंतु, या पुरणार फाटा ते डोलारखेडा फाटा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून पावसामुळे सर्व रस्ता उखडून गेला आहे.
तसेच या रस्त्याला कुऱ्हा गावापासून पूर्णाळ फाट्यापर्यंत सुमारे दहा ते बारा खेडे लागून आहे या भागातील काही न काही कामानिमित्त मुक्ताईनगर येथे ये जा करतात तसेच या खराब रस्त्यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेच्या आधी अर्धा तास अगोदर भरून निघावे लागते
राशा बरड म्हणून टेकडी जवळ एक ते दोन दिवसात रोज रस्त्यावरील खड्ड्यांनी अपघात होत आहे बऱ्याच लोकांना या खराब रस्त्यामुळे प्राणही गमवावे लागले आहे तरीही संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का असेही बोलले जात आहे
तसेच . वाहनधारकांना खड्डे चुकवितांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा या नेहमीच वर्दळ असलेल्या रस्ताची दूर अवस्था सध्या अतिशय दयनीय झाली असून पावसामुळे सर्व रस्ता उखडून गेला आहे व तसेच काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघात होत आहे रस्तात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा वाहनधारकांना प्रश्न पडला आहे. या रस्त्याच्या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन या रस्ताची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहन धारकांसह नागरिकांकडून होत आहे.
तसेच मुक्ताईनगर शहरांमधून होणारी अवजड वाहतूक डोलारखेडा फाटा येथे पूर्णड फाट्या मार्गे वळवली आहे या रस्त्याने संभाजीनगर ते इंदोर जाणारी सर्व अवजड वाहने याच मार्गाने ये -जा करतात असे असताना सुद्धा या खराब रस्त्याकडे लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासन लक्ष देत नाही खड्डे मुक्त रस्ता होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
प्रतिक्रिया
या रस्त्याने आम्हाला दररोज शेतामध्ये ये जा करावी लागते शेतामध्ये जाताना आम्हाला या खड्ड्यां मधून कसा बसा मार्ग काढावा लागतो तसेच आमच्या शेती कामाचे साहित्य नेत्यांना फार मेहनत घ्यावी लागते आणि आमच्या केळीच्या गाड्या पण याच रस्त्याने येतात या खराब रस्त्यामुळे केळी कापण्याला सुद्धा व्यापारी वर्ग येत नाही
युवराज पाटील सुकळी शेतकरी
मला रोज याच रस्त्याने शाळेत जावे लागते या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने कसाबसा प्रवास करावा लागतो मोटर सायकल चालवताना समोरील वाहन तसेच खड्डे चुकवणे फार अवघड होते संबंधितांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे जेणेकरून अपघाताचे प्रमाण होणार नाही
शरद बोदडे शिक्षक मुक्ताईनगर

