![]() |
| मुक्ताईनगरात गणेश विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम राबवली |
(अतिक खान):: मुक्ताईनगर
मुक्ताईनगर शहरात गणेश विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी, ओम साई सेवा फाउंडेशन, नगर पंचायत, पोलीस विभाग तसेच होमगार्ड कर्मचारी यांनी एकत्र येत विसर्जन स्थळी *निर्माल्य संकलन, परिसर झाडणे, पूल धुणे व स्वच्छता मोहिमेचे काम हाती घेतले.
गणेश विसर्जनासाठी शहरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर विसर्जन घाट परिसरात निर्माल्य व अन्य कचऱ्याचे प्रमाण वाढते. या कचऱ्यामुळे पर्यावरण तसेच नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वच संघटनांनी पुढाकार घेतला.
सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी निर्माल्य संकलनाचे स्टॉल उभारून भाविकांकडून निर्माल्य वेगळे करून घेतले. त्याचबरोबर नगर पंचायत कर्मचारी व पोलीस-होमगार्ड पथकांनी मिळून पूल व संपूर्ण परिसर धुऊन स्वच्छ केला.
या उपक्रमामुळे शहरात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण झाला असून नागरिकांकडून या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
गणपती विसर्जनानंतर मुक्ताईनगरात राबवलेली ही स्वच्छता मोहीम एक आदर्श उपक्रम ठरला आहे.

