![]() |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार यांना वाळू उपसा उत्खनन बाबत निवेदन.. |
मुक्ताईनगर अतिक खान
मुक्ताईनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये तापी किनारपट्टी व पूर्णा किनारपट्टी वर जीसीपी पोकलेन द्वारे वाळू उपसा व चोरटी वाहतूक बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज 23 सप्टेंबर 2025 रोज मंगळवार दिवशी तहसीलदार दालनामध्ये 4.50. मिनिटांनी निवेदन सादर केले मुक्ताईनगर शहरासह ग्रामीण भागाची भयावह परिस्थिती झाल्यामुळे वाळूमाफिया चा अतिरेक वाढलेला आहे नदीपात्रामध्ये दिवस-रात्र उत्खनन करणारे मंडळी पोकलेन जेसीबी डंपर ट्रॅक्टर या द्वारे तालुक्यात भरदड वाढलेली आहे ग्रामीण भागातील डांबरी रस्ते सुद्धा खराब अवस्थेत झालेले आहे चालताना प्रवाशांना त्रास होतो डोळ्यात वाळू धुळ डोळ्यात जाते साईड मिळत नाही अरे रावेची भाषा ऐकावी लागते सर्रास दिन ढवड्या पद्धतीने वाळू वाहतूक चालू आहे *लाखो रुपयाचा गौण खनिज महसूलचा बुडताना चित्र दिसत आहे* अंदाजे 1हजार ब्रास चोरटी वाहतूक ग्रामीण भागातून शहरात जात असेल,याला कोण जबाबदार?मनसे अध्यक्ष मधुकर भोई यांनी उपस्थित केला आहे नदीच्या पात्रात वाळू साठा उपलब्ध राहण्यासाठी पाण्याची साठवण क्षमता कायम राहते अन्यथा पात्रात पाणी उरत नाही जमिनीला भेगा जातात असं भूविज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा जळगाव यांचे सुद्धा तर्क विज्ञान आहे परंतु दिवसेंदिवस वाळू उत्खनन वाहतूक चोरटे वाहतूक थांबत नाही याआधी भ्रमणध्वनीद्वारे तहसीलदार साहेबांशी बोलणं झालेलं होतं की कारवाई अपेक्षित आहे परंतु कारवाई झाल्याचे चित्र दिसून आले नाही शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले आहे मा *.अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे परिपत्रक क्रमांक ई - कावि खनिज इत्यादी कावी 2018/08/26 819 तरतुदी प्रमाणे कारवाई करण्यात यावी* वाळूमाफिया तसेच वाहन ट्रॅक्टर डंपर जेसीबी पोकलेन अतिप्रमाणात भयंकर वाढल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल होत आहेत लाखो रुपयाचा गौण खनिज वाळू माफिया वाहून नेत आहेत एक नया पैसा शासनाच्या दरबारी येत नाही किंवा रॉयल्टी काढली जात नाही सदरील वाहनांवर व वाळू माफियांवर कारवाई अपेक्षित आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जनता दल दिव्यांग क्रांती संघटना व सर्व कार्यकर्ते यांनी आज निवेदनाच्या माध्यमातून मागील सात ते आठ महिन्याचा आढावा या निवेदनात दिलेला आहे उपस्थित मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई मनशे शेतकरी सेनेचे अध्यक्ष विनोद पाटील जनता दल दिव्यांग क्रांतीची उपजिल्हा अध्यक्ष उत्तम जुंबळे शहराध्यक्ष मंगेश कोळी ,गट अध्यक्ष सुनील कोळी, कुंदन कोळी, गणेश कोळी, संजय भोई , आदी या निवेदन देत्या वेळेस हजर होते.