![]() |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दादांचा वाढदिवस बुलडाणा येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा |
बुलडाणा : दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांचा वाढदिवस त्यांच्या बुलडाणा येथील निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी हर्षवर्धनजी सपकाळ यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास मलकापूरचे माननीय आमदार राजेशजी एकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. अरविंदजी खोलते, काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार माननीय राहुलजी बोंद्रे, प्रदेश अल्पसंख्याक महासचिव युसूफ खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सचिव डॉ. सलीम कुरेशी, माजी नगरसेवक प्राचार्य अनिल खर्चे, काँग्रेस मलकापूर शहर उपाध्यक्ष इकबाल खान, अयुब शाह यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने विविध स्तरांवरील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादांना शुभेच्छा देऊन त्यांच्यावर आपला विश्वास व कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी सपकाळ दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस पक्ष अधिक सक्षम आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष म्हणून उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.
या औचित्याने माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि आभार मानले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटीबद्ध राहण्याचे आवाहन करत आगामी काळात पक्ष अधिक संघटित आणि मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

